तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न

0
4

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) हे अध्यक्ष म्हणून तर संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलताना जवाहर शाह म्हणाले की, ‘अभिनंदन शहा यांनी संस्थेच्या कामांमध्ये दिलेले योगदान मोलाचे आहे.  त्यांच्या ३७ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उत्तम काम त्यांनी केले. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांनी अभिनंदन शहा यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘

प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना संस्थेचे सचिव मिलिंद शाह म्हणाले की, संस्थेच्या व महाविद्यालयाच्या विकास कामांसाठी रजिस्ट्रार पदावरून अभिनंदन शहा यांनी केलेले काम अतुलनीय आहे. त्यांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये अभिनंदन शहा यांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांच्या उत्तम कामाबद्दल कौतुक केले. ग्रंथालय परिचर ते प्रबंधक पदापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. महाविद्यालयासाठी केलेले योगदान त्यांनी अधोरेखीत केले. 

संस्थेचे सन्माननीय खजिनदार विकास शहा (लेंगरेकर) म्हणाले की, अभिनंदन शहा यांनी रजिस्ट्रार पदाची धुरा तर सांभाळली. परंतू याबरोबरच त्यांनी कॉलेज ऑफ फार्मसी, अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कुलचे कामही पाहिले. त्यांचे योगदान मोलाचे आहे. 

अभिनंदन शहा यांनी त्यांच्या मनोगतातून त्यांनी या महाविद्यालयामध्ये शिकत असताना कमवा शिका या योजनेमध्ये काम करून शिक्षण पूर्ण केले असल्याचे सांगितले व तेव्हापासून ते रजिस्ट्रार पदापर्यंतचा प्रवास सांगून अनेकांत एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयामुळे मी घडलो असे सांगितले.   

याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनोगते व्यक्त केली.  कार्यक्रमास अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सदस्य चंद्रवदन शहा (मुंबईकर), डॉ.हर्षवर्धन व्होरा, डॉ.महावीर अक्कोळे, अभिजित अडदंडे,  सत्यजित शहा, राहुल शहा, अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनजेमेंटचे संचालक डॉ.धनंजय बागुल, अनेकान्त इंग्लिश मीडियमचे स्कुलच्या प्राचार्या प्रणाली वडेर,  कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.दर्शन शहा हे उपस्थित होते. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, अभिनंदन शहा यांचे कुटुंबीय, त्यांचा मित्र परिवार, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड चे प्राचार्य डॉ.विकास काकडे, बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटणचे प्राचार्य डॉ.रामचंद्र सपकळ प्राध्यापक, शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी, आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विवेक बळे यांनी केले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here