तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

0
6

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

बारामती, दि. ८ सप्टेंबर २०२६ :  अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे  तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील पर्यावरण शिक्षण विभागाच्या वतीने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना रुजविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. या कार्यशाळेत दहिगाव हायस्कूल, दहिगावचे दीपक कुंभार  यांनी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी एकूण ३५ पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.अविनाश जगताप  तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  गोरखनाथ मोरे  यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक  रमेश गोसावी  व  संजय शेंडे  यांनी सहकार्य केले. वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य  डॉ.योगिनी मुळे  यांनी कार्यशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींची पाहणी केली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यशाळेचे नियोजन पर्यावरण विभागाच्या प्रमुख  अनिता पाटील तसेच, पांडुरंग ओवेकर व उदय कळंत्रे  यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here