राज्यातील ४ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना ४,७६४ कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या टप्प्याचे वितरण

0
4

राज्यातील ४ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना ४,७६४ कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या टप्प्याचे वितरण

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत चौथ्या टप्प्यातील लाभाचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले. या टप्प्यात राज्यातील ४ लाख ८६ हजार ७५७ पात्र शेतकऱ्यांना एकूण ४ हजार ७६४ कोटी ७७ लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील एकूण २० लाख ७२ हजार २५० पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी २१ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना नव्याने शेती उभारणीसाठी बळ देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. चौथ्या टप्प्यातील निधी वितरणामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous articleमाळेगाव कारखान्याचे कंपोस्ट खत शेतकऱ्यांसाठी सज्ज; पुढील आठवड्यापासून वितरणाची शक्यता..!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here