वा ट स रू मी

0
5

…वा ट स रू मी…

विज्ञानाच्या वाटेवरला
वाटसरू मी आहे
धाव धावलोथकलो परी ही
वाट सरू ना पाहे।।
क्षण क्षण संशोधन सुख शोधन
श्वास श्वास ध्यासाने
वांछियले गवसले परी सुख
समाधान ना माने।।
दूरदर्शने दूरध्वनी ये
संगणकाचे ज्ञान
शस्त्र अस्त्र यंत्रे ती क्रांती
जैविक शोध महान।।
शतक विसावे अस्तंगत ही
पहाट नव शतकाची
सुखे भौतिके अगणित, का ही
वाट विनाशाची? ।।
रक्षक मी ही संशोधक मी
प्रगती तंत्रज्ञानी
रोग विनाशक मी संपोषक
वृद्धी आयुर्मानी ।।
या वाटेवर चंगळवादी
भोगवादी ती वृत्ती
संगतीत त्या संस्कृती माझी
जाई विलयाला ती ।।
जे जे उत्तम उदात्त ते ते
विसरूनी गेलो सारे
देही भरले पश्चिमेतले
तुफान वादळ वारे ।।
या वाटेला वाट फुटावी
श्रेय तिथे ये भेटी
आजवरी जे हाय हरपले
समाधान ये हाती ।।
अशी वाट मज हवी, हवी ती
निश्चित मी मिळवीन
यत्नांती यश विश्रांती ना
तोवरी नच घेईन ।।
स्पर्धेचे युग गतिमान हे
कवेत जग की आले
फिरेन जगती परी पाय मम
मायदेशी रुतलेले ! ।।
वाटसरू मी असा तसा ना
वाट नवी दावीन
आदर्श होईल वाटचि माझी
वेड जगा लावीन! ।।
…. प्रतिभा गारटकर
ऋतुगंध काव्यमंच
येरवडा, पुणे
७,,३,,२०००१

Previous articleकर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचा गौरव; अरविंद जगताप यांचा सेवापूर्ती सन्मान
Next articleमना अर्जुना !….
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here