HomeUncategorizedसंभाजी भिडे यांना त्वरित अटक करा… राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी…

संभाजी भिडे यांना त्वरित अटक करा… राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी…

संभाजी भिडे यांना त्वरित अटक करा… राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल ची मागणी…

राष्ट्रपुरुषांच्या बद्दल वांरवार बदनामी कारक आणि बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणार्या संभाजी भिडे यांच्या वर कायदेशीर गुन्हा दाखल करुन तत्काल अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे वतीने आज रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे.

महात्मा फुले तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर भिडे यांनी नुकतेच बदनामीकारक विधाने केली आहेत याचा निषेध यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन केला आणि भिडे यांना त्वरित अटक झालीच पाहिजे

अशी जोरदार मागणी केली.बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश तायडे साहेब यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष श्री दादा राम झगडे शहराध्यक्ष स्वप्निल भागवत बारामती तालुका राष्ट्रवादी बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष श्री संतोष जगताप सर महिला अध्यक्षा सौ द्वारका ताई कारंडे सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सौ रेश्मा ताई ढोबळे सौ स्वप्नाताई लोणकर हरुण बाबा शेख एडवोकेट शिवाजीराव एजगर संपतराव बनसोडे सर श्री नितीन थोरात
संघटक तनवीर इनामदार पोपटराव खडके दादासो विधाते गणेश पवार रियाज शेख प्रमोद बोराटे हनुमंत होले शरदराव होले श्री मुन्नाभाई श्री पोपटराव कुलथे अरुण दादा नलावडे संदिप आढाव निखिल होले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी निवेदन स्वीकारले नंतर पोलिस निरीक्षक श्री दिनेश तायडे साहेब यांनी तुमच्या भावना वरिष्ठांकडे पोहोचवण्यात येईल असे सांगितले.
अलिकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रपुरुषांच्या बद्दल अतिरेकी आणि बेताल विधाने करण्याची चढाओढ पाहायला मिळते याला वेळीच पाय बंद घालावा अशी मागणी शेंडे यांनी नंतर बोलताना केली..

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on