बारामतीत पेन्शन धारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची विशेष सुविधाइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक व भारतीय डाक विभागाचा पुढाकार; ३० नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम

0
4

बारामतीत पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची विशेष सुविधा
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक व
भारतीय डाक विभागाचा पुढाकार; ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम

बारामती : केंद्र व राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना हयातीचा दाखला (Digital Life Certificate) सादर करण्यासाठी भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या वतीने Nationwide Digital Life Certificate (DLC) Campaign 5.0 ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सुरू असून, पेन्शनधारकांना घरबसल्या हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यापूर्वी अनेक पेन्शनधारकांना बायोमेट्रिक पडताळणी करताना बोटांचे ठसे स्पष्ट न उमटल्यामुळे अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख पडताळणी) सुविधेद्वारे हयातीचा दाखला सादर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सुविधेसाठी केवळ ७० रुपये शुल्क आकारले जाणार असून, बारामती टपाल विभागांतर्गत बारामती, इंदापूर, सासवड, दौंड आणि निरा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील शाखा डाकघर, सब पोस्ट ऑफिस तसेच बारामती मुख्य डाकघरामार्फत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत पोस्टमन अथवा ग्रामीण डाक सेवक पेन्शनधारकांच्या घरी जाऊन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्यास मदत करणार आहेत. यासाठी पेन्शनधारकांनी आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO No.) आणि मोबाईल क्रमांक जवळ ठेवणे आवश्यक आहे.
या उपक्रमाची माहिती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. केतन डी. शित्रे अधीक्षक डाकघर बारामती विभाग आणि श्री. स्वप्नील सावंत, शाखा प्रबंधक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांच्या वतीने देण्यात आली.

Previous articleनिरा नदीच्या पाण्यासाठी तीन साखर कारखाने एकवटले; शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी एकजूट!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here