पणदरे येथील उद्योजकांकडून माळेगाव कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेचे कौतुक; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
8

पणदरे येथील उद्योजकांकडून माळेगाव कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेचे कौतुक; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

बारामती : पणदरे (ता. बारामती) येथील एमआयडीसीमधील एका कंपनीला नुकतीच भीषण आग लागली होती. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले नसते, तर परिसरातील इतर अनेक कंपन्यांनाही आगीची झळ बसून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
या आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी माळेगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शेंडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ कारखान्याच्या गतिमान यंत्रणेला कार्यरत केले. त्यानंतर अग्निशमन विभागाचे चालक नलगे आणि मदतनीस शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता त्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले. त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे शेजारील कंपन्यांचे होणारे संभाव्य मोठे नुकसान टळले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माळेगाव कारखान्याच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आज पणदरे येथील उद्योजक व व्यापारी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित राहिले.
यावेळी उद्योजक महावीर माणिकचंद शहा, सम्यक उज्वल शहा, उज्वल माणिकचंद शहा, हर्षवर्धन रतिलाल शहा आणि ॲड. स्वप्निल महावीर शहा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तथा माळेगाव कारखान्याच्या विद्यमान चेअरमन सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संचालक मंडळाचे तसेच कारखान्याच्या गतिमान यंत्रणेचे मनापासून आभार मानले.
यावेळी अग्निशमन विभागातील नलगे, दडस आणि शिंदे हे कर्मचारी उपस्थित होते.
संकटाच्या काळात तत्परतेने धावून जात समाजाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणाऱ्या माळेगाव कारखान्याच्या अग्निशमन विभागाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here