तण खुरपती रखुमाई
विठू नांगरट करतोया
काळ्या मातीत विठू
सपान बघतोया
ढगास विनवी रखुमाई
विठू हात जोडतोया
औंदा भिजू दे रान
दान मागतोया
किती राबते रखुमाई
विठू भलरी गातोया
कर्ज फेडता -फेडता
विठू दमून जातोया
कष्ट उपसे रखुमाई
मलीदा कोण खातोया ?
मातीशी ईमान राखून
विठू भाकरी देतोया
©️®️🖋️
अंजली श्रीवास्तव करमाळा.
![](https://i0.wp.com/bhavnagari.in/wp-content/uploads/2023/06/Screenshot_2023-05-31-09-23-24-88_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e73-1.jpg?resize=696%2C993&ssl=1)