महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी व कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

0
191

महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी व कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

पुणे दि.६-महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडास्पर्धा ६ ते ९ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धांचे उद्घाटन अपर पोलीस महांचालक व महानिरीक्षक,कारागृह व सुधरसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, योगेश देसाई, प्राचार्य चंद्रमणी इंदुरकर,येरवडा कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील व राज्यातील विविध कारागृहांचे अधीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धेत १०० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, ८०० मीटर धावणे, रिंग टेनिस, व्हॉलिबॉल, कबड्डी, कराटे,भालाफेक,४×१०० रिले, ४०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, मॅटवरील कुस्ती ,चालणे इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

Previous articleएक तेजस्वी तारा: संत रोहिदास
Next articleजय जय महाराष्ट्र माझा…
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here