महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार पर्यटनातील महीलांचा सहभाग, छत्रपती संभाजीनगर पर्यटक निवास प्रथम संपुर्ण महीला संचलित पर्यटक निवास म्हणुन सुरु….

0
218


महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वाढविणार पर्यटनातील महीलांचा सहभाग, छत्रपती संभाजीनगर पर्यटक निवास प्रथम संपुर्ण महीला संचलित पर्यटक निवास म्हणुन सुरु….
महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेवृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरण दिनांक 19 जुन 2023 रोजी महाराष्ट्र शासनाव्दारे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.
शासनाव्दारे राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित धोरण आखण्यात आले असुन त्याच्या पंचसुत्रीनुसार हे धोरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व पर्यटन संचालनालय यांच्यामार्फंत सर्व संबंधित विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.


त्यानूषंगाने महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांनी तसेच पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर व अर्का उपहारगृह, खारघर यांनी महाराष्ट्र शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आलेली होती. महामंडळाचे अंमलबजावणी करण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन सदर योजना यशस्वीरित्या राबविण्यात येणार असुन त्यानुषंगाने सर्व प्रादेशिक कार्यालये व पर्यटक निवासे येथे “आई” महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे.


पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण शासनाने जाहीर केले आहे.. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण आखण्यात आले असुन महिला उद्योजकता विकास, महिलांकरीता पायाभुत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे. महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने / सवलती. प्रवास आणि पर्यटन विकास अशी सदर धोरणाची सदर धोरणाची पंचसुत्री आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे, उपाययोजना सुचविणे व संनियंत्रण करण्यासाठी मा. मंत्री (पर्यटन) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यदलाची रचना करण्यात आलेली आहे. या पंचसुत्रीनुसार हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फंत सर्व संबंधित विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येईल. हे धोरण राज्याच्या पर्यटन धोरणाच्या अधिभाज्य भाग असेल आणि वार्षिक कृती आराखडयाच्या आधारे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना (होमस्टे,हॉटेल /रेस्टारंट, टुर ॲण्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहुन विविध प्रोत्साहने आणि सवलती देएयात येणार आहेत. नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शक, महिला वाहन चालक, महिला सहल संचालक (टुर ऑपरेटर) व इतर महिला कर्मचारी यांना केद्र / राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे “छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास”

राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणुन व खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणुन चालविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचलिका श्रीमती श्रध्दा जोशी-शर्मा यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि मा. महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणुन पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे. येथील सर्व कर्मचारी या महीला असुन येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आणि आदरातिथ्याचा अनोखा अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज झाले आहे. पर्यटक निवासात आलेल्या बंगाली पर्यटक श्रीमती सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते आज महीला संचलित पर्यटक निवासाचा दिप प्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टुर ऑपरेटरमार्फंत आयोजित पर्यटन सर्किंट / पॅकेजस मध्ये महिला पर्यटकांना विविध सवलती देण्यात येत असुन महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस/युनिट्स मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठराविक कालावधीत फक्त ऑनलाईन बुकींगमध्ये 50% सुट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादीच्या विक्रीसाठी स्टॉल / जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टस मध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा जसे कि, अपंग किंवा वृध्द महिलांकरीता लिफ्ट जवळच्या खोल्या उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य, महिलांसाठी विशेष खेळ, मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टुर पॅकेजेस ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी सहल. इ. बाबी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मा. महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, पर्यटन दिन आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्तही विविध उपक्रम प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथे साजरे करण्यात आले. प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्लॅगेथॉन, पर्यावरण आणि आरोग्य यासाठी सायक्लोथॉन, कोजागिरी निमित्त चांदण्यांच्या प्रकाशात योगा आणि मेडीटेशन असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. आगामी काळातही असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महीलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढविणे आणि सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्राधान्याने काम करीत असुन त्यास मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवासामध्ये 82 खोल्या त्यामध्ये लक्झीरियस सुटस पासुन स्टॅडर्ड रूम अशी वगर्वारी आहे. हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. निवासामध्ये उपहारगृह असुन विविध स्थानिक पदार्थ आणि रुचकर जेवणाची मेजवानी सदरच्या उपहारगृहामध्ये उपलब्ध आहे. या पर्यटक निवासामध्ये प्रशस्त लॉन असुन मुलांसाठी विविध खेळणी आहेत. साधारणपणे 50 लोकक्षमतेचा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध असुन आगामी काळात या ठिकाणी जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, महीला व्यायाम शाळा अशा सुविधा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे, छत्रपती संभाजीनगर वासियांनी आणि राज्याच्या पर्यटन राजधानीत येणाऱ्या पर्यटकांनी सदरच्या उपक्रमात यापुढेही सहभाग घेवुन भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा जपत पर्यटनाचाही आनंद द्विगुणित करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

श्री. दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here