मना अर्जुना !….

0
6

२००३ मध्ये ” न्यू जर्सी “…
अमेरिका येथील
“मराठी विश्व.. साहित्य कुंज “कार्यक्रमात .. मना अर्जुना.. या कवितेचे वाचन केले होते.

….. मना अर्जुना !….

मना अर्जुना असा
बावरून नको जाऊ
तीव्र जीवन लढा
घाबरून नको जाऊ!…

अंतर बाह्य जीवनात
संघर्षच असतो
टळत नाही कोणाही
अटळच तो असतो !…

अर्थाविना जीवनात
काहीच अर्थ नसतो
जो तो अर्थामागे
धावतच असतो ! …

कधी यश हाती
अपयशही येते
जीवनाच्या लढाईत
सोसावेच लागते! …

पूर्व सोडून पश्चिमेला
परदेशी जावे जरी
ओझे समस्यांचे
नित्य डोईवरी! …

देश बदलला तरी
नशीब बदलत नसतं
यश अपयशाला
तोंड द्यायचं असतं ! …

बदलतात प्रकार
प्रश्न तेच असतात
जा कुठेही पळसाला
माने तीनच असतात ! …

परिवर्तन बाह्यांगी
अंतरी लढाच असतो
खरंच का तृप्त मी?
प्रश्न सुटत नसतो! …

अंगी कस्तुरी गंध
मृगा कळत नाही
अंतरी कृष्ण आहे
का रे कळत नाही? ! …

म्हणूनच बा मना
एकच तत्व खरे
अर्जुनच असतो रे
आपण सदा सारे ! …

निर्भय पाऊल टाक
युद्ध सूत्रधार तूच
तूच रथी अर्जुना
कृष्ण सारथी तूच ! …

…. प्रतिभा गारटकर.
*

Previous articleवा ट स रू मी
Next articleधरती को स्वर्ग बनाऍंगे..
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here