गुरु पौर्णिमेच्यानिमित्त लासुर्णे (ता. इंदापूर येथे १० जुलै रोजी मातृ-पितृ पूजन व भव्य कीर्तन महोत्सव…!

0
43

गुरु पौर्णिमेच्यानिमित्त लासुर्णे (ता. इंदापूर येथे १० जुलै रोजी मातृ-पितृ पूजन व भव्य कीर्तन महोत्सव…!

लासुर्णे (ता. इंदापूर, जि. पुणे) श्री गुरु पौर्णिमेच्या पावन दिवसाचे औचित्य साधून १० जुलै २०२५, गुरुवार रोजी लासुरणे गावात मातृ-पितृ पूजन व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे अध्यात्मभूषण ह. भ. प. सौ. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत यांच्या हस्ते त्यांचे माता-पित्यांचे पूजन. हा पूजन सोहळा कृतज्ञतेची जाणीव करून देणारा आणि भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ वंदनेचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारा ठरणार आहे.

यानंतर वाणी भूषण ह. भ. प. श्री संतोष महाराज कवठाळे (देवदैठणकर) यांचे प्रभावी, भावस्पर्शी आणि भक्तिरसपूर्ण हरिकीर्तन होणार असून, यागुरु पौर्णिमेच्या माध्यमातून मातृ पितृ भक्ती, गुरुभक्ती व संतसाहित्याची अमृतवाणी रसिकांपर्यंत पोहोचवली जाईल.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ह. भ. प. सौ. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत, कुमारी तेजश्री गोरे (महाराष्ट्र पोलीस), कुमार राम गोरे, आणि श्री. शाम गोरे यांच्या संयोजनातून करण्यात आले आहे.

हा कीर्तन सोहळा लासुरणे गावासाठी एक अध्यात्मिक पर्वणी ठरणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिसंगीताचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here