दिवाळी पाडव्याला ‘दीपवंदना’; अजितदादांच्या स्मृतींना सुनेत्रावहिनींसह पवार कुटुंबीयांचे अभिवादन
विद्या प्रतिष्ठान, बारामती
बारामती- दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने विद्या प्रतिष्ठान ग्राउंड, बारामती येथे महाराष्ट्रासह देशभरातील प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाच्या वतीने ‘दीपवंदना’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार श्री. पार्थदादा पवार आणि राष्ट्रीय सचिव श्री. जयदादा पवार यांनी सहपरिवार उपस्थिती लावली.
यावेळी पवार कुटुंबीयांनी दीपप्रज्वलन करून दिवंगत लोकनेते अजितदादांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. दिव्यांच्या प्रकाशातून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.




