संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 : रथाच्या बैलजोडीचा मान घुंडरे पाटील घराण्याला…!

0
18

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 : रथाच्या बैलजोडीचा मान घुंडरे पाटील घराण्याला…!

आळंदी, २०२५ — संपूर्ण महाराष्ट्राच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि परंपरेचा प्रतीक असलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा अधिकच भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडत आहे. या वर्षीच्या सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा रथाच्या बैलजोडीचा मान घुंडरे पाटील घराण्यातील श्री विवेक ज्ञानेश्वर घुंडरे आणि श्री सचिन बाळासाहेब घुंडरे पाटील यांना प्राप्त झाला आहे.

या मानाच्या निमित्ताने जय भगवान प्रतिष्ठान यांच्या वतीने घुंडरे पाटील घराण्याचा आळंदी नगरपालिकेचे मा. नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर रायकर व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. मनोहर दिवाणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पुष्पहार, शाल-श्रीफळ आणि सन्मानपत्र देवून त्यांना गौरविण्यात आले.

या वेळी प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सनई-चौघड्यांच्या निनादात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात सत्कार सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.

संपूर्ण घुंडरे पाटील कुटुंबीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असून, त्यांनी वारकरी परंपरेतील या महत्त्वाच्या सेवेचा गौरव टिकवून ठेवण्याचे व्रत पत्करले आहे. त्यांचा हा सन्मान ही केवळ घराण्याची नव्हे तर संपूर्ण आळंदीकरांची शान आहे.

हरिपाठ आणि नामस्मरणात न्हालेला हा सोहळा ज्ञानेश्वरी परंपरेचे जीवनतत्त्व जपत पुढे निघाला आहे.

जय जय राम कृष्ण हरि!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here