Homeबातम्याबारामती- दौंड-इंदापूर रिक्षा कृती समितीची बैठक संपन्न…!

बारामती- दौंड-इंदापूर रिक्षा कृती समितीची बैठक संपन्न…!

बारामती- दौंड-इंदापूर रिक्षा कृती समितीची बैठक संपन्न...!

बारामती- दौंड-इंदापूर रिक्षा कृती समितीची बैठक संपन्न…!

प्रतिनिधी : दिनांक 15/1/2024 रोजी बारामती -दौंड- इंदापूर रिक्षा कृती समितीची स्थापना करण्यासंदर्भात मधुबन हॉटेल, बारामती येथे रिक्षा चालकांची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीमध्ये बारामती- दौंड- इंदापूर या तीन तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कारभारी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव मा. प्रशांत ( नाना) सातव उपस्थित होते.
वरील तीनही तालुक्यातील रिक्षा चालकांचे आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडविणे, शासन दरबारी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, रिक्षा चालकांसाठीचे कल्याणकारी मंडळ बाबतीत पाठपुरावा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बारामती -दौंड -इंदापूर या तीनही तालुक्यातील रिक्षा चालकांना केंद्रबिंदू मानून व त्यांना संघटित करून सामाजिक प्रवाहात आणणे हा या कृती समितीचा मुख्य उद्देश आहे. ही कृती समिती पक्ष, संघटना, व राजकारण विरहित पद्धतीने कार्यरत राहणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सर्वांनुमते मा. प्रशांत( नाना) सातव यांची, तर सचिवपदी प्रा. डॉ . भिमराव मोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी अण्णा समिंदर, उत्तम लोंढे, किशोर कांबळे, मनोज साबळे, बाबासाहेब कोरी, जावेद सय्यद, राजेश बोर्डे, नितीन खडके, हरिश्चंद्र शिंदे, अभिजीत भंडारे, शांतीलाल सोनवणे इ. मान्यवर रिक्षा चालक उपस्थित होते.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on