डॉ.दत्तात्रय बाळू शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती पीएच.डी. पदवी प्राप्त
अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय,बारामती येथील वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी डॉ.दत्तात्रय बाळू शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती पीएच.डी. पदवी नुकतीच जाहीर झाली.
डॉ.दत्तात्रय शिंदे यांनी क्षारपड शेतजमिनीत वाढणाऱ्या फिंबरीस्टाईलिस डायकोटोमा (मोथा गवत) या वनस्पतीचा जमिनीची क्षारता कमी करण्यासाठीची उपयुक्तता या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना विद्यावाचस्पती ही पदवी प्रदान केली. बारामती तालुक्यातील काही ठिकाणी असलेल्या क्षारयुक्त जमिनीमुळे बियांची उगवण क्षमता व रोपांची वाढ खुंटल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर डॉ.दत्तात्रय शिंदे यांनी केलेले संशोधन अत्यंत उपयुक्त व क्षारयुक्त नापीक जमिनीसाठी वरदान ठरेल.
या कामी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.भगवान शंकर माळी यांचे मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांना आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी प्राप्त झाली आहे.
डॉ.दत्तात्रय बाळू शिंदे यांचे अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), संस्थेचे पदाधिकारी सर्व सदस्य, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.महादेव कानडे, उपप्राचार्य, प्राध्यापक व सर्व विद्यार्थ्यांकडून डॉ.दत्तात्रय शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




