HomeUncategorized३७ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाची जिम्नॅस्ट...

३७ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाची जिम्नॅस्ट इशिता रेवाळेची उल्लेखनीय कामगिरी

मुंबई :ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत यांच्याकडून :-

३७व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाची जिम्नॅस्ट इशिता रेवाळेची उल्लेखनीय कामगिरी!

प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या मापसा, गोवा येथील ३७ व्या नॅशनल गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज व व्हॉल्टिंग टेबल या क्रिडा प्रकारात कांस्य पदकांची कमाई करत वैयक्तीक पाचवा क्रमांक मिळवत मुलींच्या महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवण्यास हातभार लावला. श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवल्या बद्दल इशिता वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टीप: (डावीकडून) प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक विशाल कटकदौंड,अध्यक्ष श्री. अरविंद प्रभू , पदकविजेती इशिता सुनिल रेवाळे.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on