HomeUncategorizedभारतीय युवा पँथर संघटना निंभोरे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न

भारतीय युवा पँथर संघटना निंभोरे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न

भारतीय युवा पँथर संघटना निंभोरे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न

फलटण: भारतीय युवा पँथर संघटनेच्या फलटण तालुक्यातील दुसरी शाखा निंभोरे येथे स्थापन करण्यात आली.शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विक्रम बनकर,तानाजी ढोले उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले की पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी काम केले पाहिजे.सामाजिक काम करीत असताना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.त्यामुळे दर महिन्याला कार्यकर्ता आढावा बैठक घेताना कायद्याची माहिती व्हावी यासाठी प्रशिक्षण शिबिर देखील घेणार आहोत.
निंभोरे शाखेच्या अध्यक्ष पदी दयानंद अहिवळे,उपाध्यक्ष पदी मंगेश चौधरी,कार्याध्यक्ष रामभाऊ मदने,सचिव शरद रणवरे,सरचिटणीस ओंकार पवार,संपर्क प्रमुख साहेबराव भंडलकर,सहकार्यध्यक्ष आभिषेक पोटफोडे,सहसचिव योगेश कांबळे,संघटक सोनू पाटोळे यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख शुभम गायकवाड,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव, सातारा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण काकडे ,सातारा महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा भोसले, सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी,तालुका उपाध्यक्ष आदेश कांबळे,तालुका संघटक संदीप पेठकर,तालुका कार्याध्यक्ष पार्वती काळे,फलटण शहर अध्यक्ष पूजा जगताप,फलटण शहर कार्याध्यक्ष रझिया शेख बारामती तालुका संघटक हेमंत कांबळे,झिरपवाडी अध्यक्ष रत्नदीप इंगळे,सरचिटणीस किरण इंगळे,उपाध्यक्ष विकास रिटे,सदस्य भाग्यवंत वायदंडे,सदस्य अजय काळे,भाग्यश्री राउत,शिला अहिवळे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on