सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन पदी राजवर्धन शिंदे आणि व्हाईस चेअरमन संग्राम सोरटे

0
3

आदरणीय अजितदादांनी जिवापाड जपलेला, कष्टानं उभा केलेला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रभागी ठेवलेला आपला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना..!

आज कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या वेळी उपस्थित राहिलो. नवनिर्वाचित चेअरमन राजवर्धन शिंदे आणि व्हाईस चेअरमन संग्राम सोरटे यांचं मनापासून अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संचालक मंडळातील सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. कारखान्याची पुढची वाटचाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कारखान्याच्या प्रगतीबाबत चर्चा केली.

दादांनी या कारखान्यासाठी काय केलंय, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी जपलेला हा सहकाराचा वारसा असाच पुढं न्यायचा, शेतकऱ्यांचा विश्वास टिकवायचा आणि सोमेश्वरची मान उंचावेल असंच काम करायचं, हीच आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.

दादांचं स्वप्न, सुनेत्रावहिनींचे व पार्थ दादांचे मार्गदर्शन आणि आपल्या सगळ्यांची साथ या जोरावर नक्कीच सोमेश्वर कारखान्याची दैदिप्यमान प्रगती साधली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here