अनेकांन्त एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रगुप्त शहा वाघोलीकर यांची निवड; धवल शहा यांची नियम मंडळावर नियुक्ती..!

0
5

अनेकांन्त एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रगुप्त शहा वाघोलीकर यांची निवड; धवल शहा यांची नियम मंडळावर नियुक्ती..!

बारामती : गेल्या ६५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेकांन्त एज्युकेशन सोसायटीने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून बारामतीच्या शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेकांन्त एज्युकेशन सोसायटी


या संस्थेचे अध्यक्ष जव्हारशेठ वाघोलीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संस्थेच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या अध्यक्षपदी गेल्या २० वर्षांपासून संस्थेशी नाते जोडलेले असलेले चंद्रगुप्त शहा वाघोलीकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच धवल शहा यांची नियम मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.


संस्थेच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत या निवडीचा निर्णय घेण्यात आला. नव्या नेतृत्वामुळे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक गती मिळेल, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा पुढे सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
६५ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत संस्थेच्या विकासासाठी नवे नेतृत्व निश्चित झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातून या निवडीचे स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here