सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीतील मुस्लिम व्यवसायिकांना ६.६३ कोटींच्या धनादेशांचे वितरण
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या वतीने बारामती शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजातील २२१ लघु व्यवसायिकांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे धनादेश (ऑनलाइन स्वरूपात) वाटप करण्यात आले. एकूण ६ कोटी ६३ लाख रुपयांचे अनुदान या माध्यमातून वितरित करण्यात आले.

हा वितरण सोहळा २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी भवन, बारामती येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनेत्रा पवार (खासदार व तालीका सभापती) उपस्थित होत्या. या उपक्रमाच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील लघुउद्योग आणि व्यवसायांना चालना मिळेल, तसेच अनेकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती
सुनेत्रा पवार – खासदार व तालीका सभापती मुश्ताक अंतूले – चेअरमन, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
गफार मगदुम – एम.डी., मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
अलताफ सय्यद – संचालक, मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणे राजवर्धन शिंदे – अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
संभाजीनाना होळकर – संचालक, पीडीसी बँक
सचिन सातव – अध्यक्ष, बारामती सहकारी बँक
व्यवसायिकांना मोठा आर्थिक लाभ या योजनेमुळे बारामतीतील मुस्लिम लघु उद्योग आणि व्यवसायांना मोठा आधार मिळाला आहे. स्थानिक व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, आर्थिक स्थैर्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. या उपक्रमामुळे बारामतीतील मुस्लिम समाजातील उद्योजक व व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होतील.

एकता ग्रुप, बारामती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
