बारामतीत शरायू फाउंडेशन आणि यूगेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून भूमी उत्सव प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन..!

0
6
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

भूमी उत्सव प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन..!
बारामती : युवा नेते युगेद्र दादा पवार यांच्या संकल्पनेतून शरयु फौंडेशन आयोजित “भूमी उत्सव प्रदर्शन 2026” चे आयोजन दि. 16 मे ते 17 मे 2026 दरम्यान बारामती येथील जिजाऊ भवन, भिगवण रोड परिसर येथे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये शेती, ग्रामीण उद्योग, महिला बचत गट, कृषी तंत्रज्ञान, हस्तकला, उद्योजकता तसेच स्थानिक उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भूमी उत्सव प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील नवकल्पना, स्वावलंबन आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळणार असून बारामतीच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here