शालेय स्तरावरील विदयार्थ्यांवर देशनिस्टा रुजविणे ही काळाची गरज डॉ. संजय भोसले (उपाध्यक्ष, इस्कॉन पुणे) –
शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये देशनिस्टा रुजविन्यासाठी “समूह गान स्पर्धा” आणि “भारत को ज्यानो” ही स्पर्धा देशभर राबविणे ही काळाची गरज असल्याचे इस्कॉन पुणे चे उपाध्यक्ष डॉ. संजय भोसले यांनी व्यक्त केले.
भारत विकास परिषद पुणे पूर्व तर्फे आयोजित “समूह गान स्पर्धा” आणि “भारत को ज्यानो” यास्पर्धेचे आयोजन टिंगरे नगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल मध्ये केले होते. या स्पर्धेत 17 शाळांचे 270 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. एका बाजूला आपल्या भारत देशाची संस्कृती, संस्कार आणि देशप्रेम आपल्याच देशाचे काही नागरिक विसरत चालले असतानाच दुसऱ्या बाजूला भारत विकास परिषद सारख्या देशभक्तीने प्रेरित संस्था शालेय स्तरावररील विद्यार्थ्यांमध्ये देशनिस्टा रुजविन्यासाठी “समूह गान स्पर्धा” आणि “भारत को ज्यानो” ही स्पर्धा देशभर राबवतात हे खूप कौतुकास्पद आहे. याच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विगणहर्ता प्रतिष्ठान चे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी शालेय स्तरावररील विद्यार्थ्यांमध्ये “समूह गान स्पर्धा” आणि “भारत को ज्यानो” ही स्पर्धा पाहून आणि ऐकुण मी भारावून गेलो. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागृत करणे काळाची गरज आहे. आणि हे भारत विकास परिषदेच्या माध्यमातून केले जात आहे हे खूप कौतुकास्पद आहे. पुणे इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी भारत विकास परिषदेच्या आशा देशभक्तिपर कार्यक्रमाना आमचा नेहमीच पाठिंबा राहील असे स्पष्ट केले. यावेळी भारत विकास परिषदेचे रास्ट्रिय पदाधिकारी दत्ताजी चितळे, किशोर गुजर, अनिरुद्ध तोडकर, रेणुका चलवदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरंम गीताने व प्रतीमा पूजनाने झाली. समूह गाण स्पर्धेचे परीक्षक श्रीमती साधन शर्मा आणि संतोष गुरव यांनी विद्यार्थ्यांना गाण्याचे काही टिप्स देऊन सखोल मार्गदर्शन केले. या देशभक्तिपर समूह गाण स्पर्धेत व्हीजन इंग्लिश स्कूल पुणे या संघाने प्रथम क्रमांक, बीजेएस स्कूल पुणे यांनी दूसरा क्रमांक तर मोझे हायस्कूलने तिसरा क्रमांक मिळविला. “भारत को ज्यानो” ही स्पर्धेत प्रथम क्रमांक सूंदरबाई मराठे स्कूल वडगांव शेरी पुणे, दूसरा क्रमांक केंद्रीय विद्यालय लोहगाव, पुणे तर तिसरा क्रमांक हिंद इंग्लिश स्कूल पुणे यांनी मिळविला. यासाठी भारत विकास परिषद पुणे पूर्व चे सभासद वेंकटेश पतकी, बाहेती, अनिरुद्ध तोंडकर, वर्षा कुलकर्णी, सुलभा गडगी, रसिका चनशेट्टी आणि सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. पूनम जोशी.
कार्यक्रमाचे प्रास्तविक भारत विकास परिषद पुणे पूर्व चे अध्यक्ष डॉ. शंकर मुगावे यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती ज्योति बाहेती आणि श्रीनिवास चनशेट्टी यांनी केले व आभार चंद्रकांत पांपटवार यांनी मानले.