राजेंद्र पवार यांचे शेती आणि शेतकरी समर्पित कार्य प्रेरणादायी

0
16

राजेंद्र पवार यांचे शेती आणि शेतकरी समर्पित कार्य प्रेरणादायी

केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

राजेंद्र पवार यांना डॉ. सी.डी. मायी कृषीतज्ज्ञ पुरस्कार प्रदान

नागपूर – शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक शेती तंत्र पोहोचविण्याचे, विविध नवनवीन आणि यशस्वी प्रयोगांशी शेतकऱ्यांना अवगत करणे या कार्यामधून राजेंद्र पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी राजेंद्र पवार यांचा गौरव केला.

कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. सी.डी. मायी कृषीतज्ज्ञ’ पुरस्कार बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी.डी. मायी, ज्येष्ठ कृषी पत्रकार सुधीर भोंगळे, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, श्रीराम काळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘राजेंद्र पवार यांचे कृषी क्षेत्रातील कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे डॉ. सी.डी. मायी यांच्या नावाने असलेला पुरस्कार त्यांना मिळत असल्याचा मनापासून आनंद आहे. डॉ मायी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्य करीत आहेत. सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे कार्य सुरू आहे, ही आदर्श बाब आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात नर्सरी कायदा आला.’

शेतीमध्ये जमीन हा महत्त्वाचा घटक आहे. दर्जेदार उत्पादनासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. पाण्याच्या संदर्भात काम करण्याची गरज आहे. ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी हेही घटक शेतीमध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या सर्व तंत्रांचा वापर शेतीमध्ये केला तरच एकरी उत्पन्न वाढेल आणि शेतकरी समृद्ध होईल. राजेंद्र पवार आणि त्यांचे ट्रस्ट यासंदर्भात सातत्याने शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करीत आहे, ही समाधानाची बाब आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here