
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांची शेंडे वाड्यावर सदिच्छा भेट
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. केशवराव बापू जगताप आणि व्हाइस चेअरमन राजेंद्र नाना ढवाण पाटील यांनी शेंडे वाड्यावर सदिच्छा भेट देऊन प्रकृतीची चौकशी केली. दिलखुलास स्वभावाचे हे दोन्ही नेते आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असतात.

या भेटीत ऊस शेती, कारखाना प्रगती यावर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी रामचंद्र नाना मदने, बबनराव गावडे सर, लालासाहेब गावडे पाटील आणि नाना गावडे पाटील यांचीही उपस्थिती होती.
नितीन शेंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.