बारामती बाजार समितीचे जळोची भाजी मार्केट मध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव

0
9


बारामती बाजार समितीचे जळोची भाजी मार्केट मध्ये लसणाला उच्चांकी बाजारभाव

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केट मध्ये लसणाला उच्चांकी २८० रूपये प्रति किलोस असा भाव मिळावा तर लसणाला सरासरी २२० रूपये प्रति किलो भाव मिळत आहे. त्याच बरोबर शेवग्याचे भाव ही तेजीत असुन शेवग्याला प्रति किलो कमाल २५० रूपये व सरासरी २०० रूपये असा उच्चांकी दर मिळत आहे. तसेच गवार, वांगी, मिरची, भेंडी, वाटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले व इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांना चांगले दर मिळत आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने बाजारात आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
बारामती बाजार समितीने जळोची भाजी मार्केट आवारात शेतकरी व व्यापा-यांना विविध सुविधां बरोबरच सेलहॉलची उभारणी केलेली आहे. यामुळे शेतामालाचे ऊन, वारा, पावसापासुन संरक्षण होत आहे. तसेच शेतमालाला कटती नाही, कुठलीही सुट नाही. त्यामुळे बारामती सह आसपासच्या तालुक्यातुन फळे व भाजीपाल्याची आवक होत आहे. आवारात फळे व भाजीपाला उघड लिलावाने खरेदी विक्रीची सोय असल्याने बाहेरील खरेदीदार येत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल बाजार आवारातच विक्री करावा असे आवाहन बारामती बाजार समिती तर्फे करणेत येत आहे.

Previous articleजाहीर आवाहन
Next articleविद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत महात्मा फुलेंना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here