Homeबातम्याबारामती उपविभाग कृषि उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थचे रौप्य महोत्सवी वर्ष...

बारामती उपविभाग कृषि उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थचे रौप्य महोत्सवी वर्ष २४ वी वार्षिक सर्वसाधणर सभा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी:-

बारामती उपविभाग कृषि उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थचे रौप्य महोत्सवी वर्ष व
चोविसावी वार्षिक सर्वसाधणर सभा उत्साहात संपन्न

बारामती उपविभाग कृषि उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थेची स्थापना बारामती, दौंड, इंदापुर व पुरंदर या तालुक्यातील बाजार समिती सेवकांची मिळुन सन २००० मध्ये करण्यात आली. संस्थापक चेअरमन म्हणुन बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप होते. आज ही योगायोगाने रौप्य महोत्सवी वर्षात अरविंद जगताप हेच अध्यक्ष आहेत. त्यांचे अध्यक्षतेखाली सेवक पतसंस्थची सन २०२३-२४ ची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सेवक पतसंस्थेच्या स्थापनेस २५ वर्षे झाल्याने रौप्य महोत्सवी वर्ष १२ जुन रोजी कार्यक्रम घेऊन साजरे करणेत आले. त्यात स्मरणिका प्रकाशन, इयत्ता १० व १२ वी मध्ये ८०% पेक्षा जादा गुण मिळेलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, शाल, बुके व नारळ देऊन सन्मान करणेत आला. तसेच सेवकांची मुले डॉक्टर, इंजिनिअर, बी.टेक उर्तीर्ण झाली आहेत. त्यांचा ही सत्कार व सन्मान बारामती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार आणि निरा बाजार समितीचे सभापती शरदराव जगताप यांचे शुभहस्ते करणेत आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी केले. पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापुन व स्मरणिकेचे प्रकाशन करणेत आले. यावेळी सभापती सुनिल पवार आणि शरदराव जगताप यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी त्यांनी पतसंस्थेच्या कामकाजा बाबत कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणात सेवक पतसंस्था कमी व्याजदरात कर्ज देऊन सेवकांच्या गरजा भागवते मात्र बाहेरचे कुठेही कर्ज घेतले नाही. असेच आदर्श काम यापुढे ही करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सेवक पतसंस्थेचे भाग भांडवल १.८६ कोटी असुन कर्ज मर्यादा रू. ५ लाख ते ३८ लाखापर्यन्त आहे. कर्जावरील व्याजदर ६.६५% असुन गेली २४ वर्षे पतसंस्थेस लेखा परिक्षण अ वर्ग मिळाला आहे. गेली २४ वर्षे पतसंस्था जुन अखेर पर्यन्त वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करून सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप केले जाते. यावर्षी ६.४०% लाभांश वाटप करणेत आला. यापुढे सेवक पतसंस्थेने कर्जदारांची विमा पॉलीस घेणेचा निर्णय वार्षिक सभेत घेणेत आला. तसेच पगारानुसार कर्ज मर्यादा ठरवताना पगाराचा दर पाच हजाराचे टप्प्यात कर्ज मर्यादा ठरविणेत आली.
यावेळी बारामती बाजार समितीचे उपसभापती निलेश लडकत व सदस्य तसेच निरा बाजार समितीचे सदस्य प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. सेवक पतसंस्थेचे उपाध्यक्ष आशपाक मुलाणी, व्यवस्थापक रविंद्र तरटे आणि संचालक सुर्यकांत मोरे, शरद भोसले, बाबासो देवकाते, श्रीमती सुरेखा कुर्ले, , कृष्णांत खलाटे, अविनाश बळगानुरे, तुषार माने, संतोष शिंदे आणि सभासद तसेच दौंड बाजार समितीचे सचिव मोहन काटे उपस्थित होते. रौष्य महोत्सवी वर्ष आनंदात व खेळीमेळीत साजरे झाल्याने सभा उत्साहात पार पडली. सभेचे सुत्रसंचलन सुर्यकांत मोरे व शरद भोसले यांनी केले तर उपाध्यक्ष आशपाक मुलाणी यांनी आभार मानले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on