बारामतीत मोफत गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन, गर्भाशयाच्या पिशवीचे दुर्बिणीद्वारे तपासणी शिबिरात ३० शस्त्रक्रिया शेकडोच्यावर तपासणी….!

0
86

प्रतिनिधी:
यशश्री मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च सेंटर व भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा ग्रामीण एक व पुणे विभाग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने तारीख 6 मे ते 18 मे 2024 पर्यंत आयोजित केलेल्या वैद्यकीय शिबिरामध्ये मोफत गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन, गर्भाशयाच्या पिशवीचे दुर्बिणीद्वारे तपासणी व मुल बंद होण्याचे ऑपरेशन असे सर्व मिळून एकंदरीत 30 ऑपरेशन मोफत करण्यात आले व 100 पेक्षा जास्त पेशंटने आपले मोफत चेकिंग करून घेतले. ह्या शिबिरचे नियोजन डॉ. सुनील शहा , डॉ मेधाजी शहा व डॉ यशश्री शहा ह्यांच्या सहकार्याने त्यांच्या हॉस्पिटल मध्ये करण्यात आले. ह्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे व भारतीय जैन संघटनेचे बारामतीत ह्या सामाजिक उपक्रमाचे बारामतीतून कौतुक करण्यात आले व सकल जैन समाज कौतुक करत होते.
शिबिराचे आयोजक श्री.निखिल रविंद्र मुथा भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा ग्रामीण एक सदस्य व श्री.पंकज पोपटलाल गादिया भारतीय जैन संघटना पुणे विभाग सदस्य व संघटनेच्या सदस्यांच्या सहकार्याने या शिबिरास खूप चांगला प्रतिसाद मिळाला असे डॉ.मेधा शहा ह्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here