बारामतीकरांचा सन्मान रॅलीला भरभरून प्रतिसाद रस्त्यावर अवतरली बारामतीकर जनता…..
संतोष शिंदे संपादक (भावनगरी)
दि.२ सोमवार रोजी पावसाची रिमझिम व् त्या ठिकाणी फटाक्याची अतिषबाजी जेसीबीने पुष्पवृष्टी, टू- व्हीलर ,फोर व्हीलर, गाड्यांचे हॉर्न …एकच वादा अजितदादा कार्यकर्त्यांकडून जल्लोष हर्ष उल्हास यामुळे बारामती नगरी अगदी दुमदुमून गेली होती काल जन सन्मान यात्रेला बारामतीकरांचा सन्मान रॅलीला भरभरून प्रतिसाद रस्त्यावर अवतरली बारामतीकर जनता…..
जनसन्मान यात्रेचे जंगी स्वागत,
जेसीबीमधून फुलांची उधळण…
जनसन्मान यात्रा बारामतीत दाखल झाली तेव्हा बारामतीकरांनी अजित पवार यांचे जंगी स्वागत केल. जनसन्मान यात्रेनिमित्त बारामती करांनकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, जय पवार, यांचेवर जेसीबीच्या माध्यमातून फुलाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले.
राष्ट्रबादी काँग्रेस पक्षाची बारामतीत जन सन्मान यात्रा आली . कार्यकर्त्यांच्या उत्साह जल्लोषाने हर्षमानसी मोसमसोबत स्वागताला होता,अशा वातावरणामुळे यावेळी अजित पवार भारावून गेले होते. त्यांच्या स्वभावातून काल परत दिसून आले होते. मिशन हायस्कूल येथे ते बोलताना म्हणाले की… सध्या पवार कुटुंबतील लोक बारामती जास्तच फिरायला लागल्याचे कोण कोण लोक बोलून दाखवतात तर अश्याची चर्चा बारामतीतील होत आहे . आजवर कधी नाही पहिल्यांदाच घडतंय,
परंतु इथून पुढच्या काळात खंबीर सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे.
महिला मुलींच्या सुरक्षेकरिता बारामतीतून महाराष्ट्रात संदेश जाईल असे कठोरात कठोर पावले त्या ठिकाणी घेण्याचे तसे प्रयत्न करेल, कोणाच्या ही गय केली जाणार नाही .
छत्रपती शिवाजी
महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. कोणत्याही सरकारला आपल्या काळात अशी घटना घडावी, असे वाटत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. त्याबाबत राज्यातील जनतेची माफीही मागितली. मात्र,
विरोधकांनी मुख्यमंत्री आणि न उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन केले.
आमच्या छायाचित्रांना जोडे काय मारता, हिंमत असेल तर, समोर येऊन दोन हात करा,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथे जन सन्मान यात्रेत अजित पवार बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच दैवत आहेत. या प्रकरणात ज्यांची चूक झाली त्याला शोधून काढले जाईल. मात्र त्याचे कोणीही राजकारण करू नये.
महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
महिलांच्या सुरक्षिततेला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल.
महिलांचा सन्मान करणे हाच या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून काही जण टीका करत आहेत. मात्र, सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेल्यांना गरिबी कळणार नाही,
असेही ते आपल्या रॅलीस सबोधताना म्हणाले.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वत्र प्रयत्न बारामतीच्या शहर परिसरात राज्यातील विविध ठिकाणी झाले पाहिजे.
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार सुनेत्रा पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, युवा नेते जय व पार्थ पवार, प्रदीप गारटकर, विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर, संभाजी होळकर, योगेश जगताप, सचिन सातव, सुभाष सोमाणी, पोपटराव गावडे,अविनाश बांदल, पार्थ गार्लींद, अभिजीत काळे, बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, साधू बल्लाळ, विशाल जाधव, अनिता गायकवाड, किरण ताबरे, यांच्यासह बारामती शहर ब तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.