पुरूष..बाप्या..मर्द नावे मोठी देवून वेदना कधी लपत नाही मर्दाला ही दर्द होतो..

0
2

पुरूष..

पुरूष..बाप्या..मर्द
नावे मोठी देवून
वेदना कधी लपत नाही
मर्दाला ही दर्द होतो
बस्स तो दाखवत नाही..

” रडतोस काय बायगत “
म्हणून रडणे संपवले जाते
कोमल हृदयाचे फुलणे
क्षणातच पोक्त होते…

पुरूष ही स्ञीत्वातून
स्ञीत्व अंगीकारून येतो..
स्ञीपासून पुरूषाला वेगळे करून
समाज कायमची दरी
निर्माण करून जातो…

याच दरीत पुरूषातील कोमल
आईपण..बाईपण गाढले जाते..
जन्माला येतात फक्त पुरूषी धडे
मग येथून अधोगती सुरू होते…

हाडामासाला दिसू लागतात
फक्त मनमोहक हाडामासाचे देह..
नाती,मर्यादा ,वय ,सीमा .माया
सगळे संपून कुरतडली जाते काया…

आज पुरूष म्हटले तरी
अविश्वासाचा अंगावर काटा येतो
बाबा..पप्पा..भाऊ..दादा..काका
कोण मिठीत सुरक्षा देतो…

कोणी संपवला हा सुरक्षित धागा..
पुरूष पुरूष करून कोणी केला दगा…
बाईला पुरुषापेक्षा कधीच वरचढ व्हायचे नव्हते..
अंतरंगातील नात्याला कधीच संपू देयचे नव्हते ..

बाईने पुरूषाला कधीच कमी लेखले नाही..
कधीच कोणती सीमा आखली नाही..
मग पुरूषप्रधान संस्कृतीने पुरूषातील ..
कोमल स्ञीत्व मारून काय मिळवले..

या समाजातील एकाच नाण्याच्या
स्ञी पुरूष ह्या दोन बाजू…
मग एक कमी एक जास्त मग
कसा समतोल होणार …
अधोगतीला गेलेल्या मानसिकतेला…
कोणता ज्ञानी पुरूष वरती घेणार …

पुरूषांना ही भावना असतात
हे पुरूषांनीच लक्षात घ्यावे …
कोणता ही पुरूष रडू लागला तर
मनसोक्त त्याला रडू द्यावे…

बाई रडते आणि पदर खोवते
पण ती कधीच खचून जात नाही
कर्जबाजारी झालो म्हणून
बाई कधीच फास घेत नाही..

म्हणून रडण्याला कमी लेखू नये..
कोवळ्या काळजात अहंकारी
पुरूषी बीज रोवू नये..
मुलांना ही मुक्त मनसोक्त मोकळे रडू द्यावे…
जबाबदार पुरूषी वटवृक्षाचे संगोपन
लहानपणापासूनच करावे…

पुरूष दिनाच्या सर्वच पुरूषांना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐🙏💐

🙏राधिका जाधव – अनपट 🙏@

Previous articleबारामती एमआयडीसीतील प्रश्नांबाबत बैठक घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here