गुडटच आणि बॅडटच (मायेचा स्पर्श आणि घाणेरडा स्पर्श) ओळखणे आज काळाची गरज आहे – प्रा.अंजली राठोड श्रीवास्तव

0
16

प्रतिनीधी : गुडटच आणि बॅडटच (मायेचा स्पर्श आणि घाणेरडा स्पर्श) ओळखणे आज काळाची गरज आहे – प्रा.अंजली राठोड श्रीवास्तव .
न.प.मुलामुलींची शाळा नं ४ करमाळा येथे सखी सावित्री समिती सभा अंतर्गत मुलींसाठी नुकताच हा कार्यक्रम राबविण्यात आला.
लागोपाठ मुलींच्या संदर्भातल्या अस्वस्थ करणा-या घटनांनी आज सर्वांची झोप उडवली आहे.
चांगला स्पर्श आणि घाणेरडा स्पर्श कसा ओळखायचा? तो कोण करतो?कुठे केला जातो? याची सखोल व अभ्यासपूर्ण माहिती समुपदेशक अंजली श्रीवास्तव यांनी मुलींना दिली.
पोक्सो कायदा ( २०१२ ) संदर्भात ही त्यांनी माहिती देऊन घाणेरडा स्पर्श झाल्यावर सर्वप्रथम मोठ्यांने ओरडणे व नंतर सुरक्षित ठिकाणी पळणे घरातील आईबाबांना लगेच सांगणे अशा महत्वपूर्ण गोष्टी कृतीतून दाखवून दिल्या.
(बॅडटच)घाणेरडा स्पर्श कोणत्या चार ठिकाणी केला जातो हे ही विद्यार्थींना समजावून सांगितले.
इ ३/४ थी च्या मुलींनी अगदी आत्मविश्वासाने या गोष्टी समजून घेतल्या.


सचिव शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला टांगडे मॅडम यांनी सखी सावित्री समिती स्थापन करण्याचा उद्देश व मुलींसाठी संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.तसेच सदर समिती प्रशासन अधिकारी मा.अनिल बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली असे ही त्यांनी मत मांडले.
सदर कार्यक्रमास अंगणवाडीच्या मनिषा मांडवे, आरोग्य विभाग परिचारिका ज्योती भोसले, निंबाळकर ताई , माता पालक स्वाती बोकन,
शिक्षिका आसाराबाई भोसले मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच वरील सर्व मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल दगडे शिक्षक संतोष माने सर,मुसळे सर, दुधे सर यांनी पण कार्यक्रमास हजेरी लावली होती.
सदर शाळेचे कौतुक करत अंजली श्रीवास्तव म्हणाल्या की सदर शाळेने मुलींच्या संरक्षणासाठी काळाची गरज ओळखून कराटेचे ही प्रशिक्षण दिले.
सदर सभेस दोनदोन विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी ही उपस्थित होते.
आभार मुख्याध्यापिका सौ चंद्रकला टांगडे यांनी मानले.
चहापानानंतर सभेची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here