उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा!
बारामती:दि. २५ एप्रिल २०२५
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून २०२५-२६ साठी प्रथम मान्यता मिळाली आहे.
या निर्णयामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी १०० प्रवेश मिळणार आहेत. अजित पवार यांच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या या महाविद्यालयामुळे बारामतीत पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे.
हा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवणारा ठरणार असून, बारामती शैक्षणिक हब म्हणून अधिक बळकट होणार आहे.
