अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या जाहीर पक्ष प्रवेश…!
विक्रम (पंत) थोरात यांचा राष्ट्रवादीत (Ap) प्रवेश..!
पक्ष प्रवेशादरम्यान भव्य युवक बाईक रॅलीचे आयोजन…
बारामती (दि :७)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार (दि. ८) सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर आहेत. उद्या
सकाळी १० वाजता कसबा येथील राष्ट्रवादी भवनात अजितदादांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.. तसेच दुपारी १२ वाजता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या दरम्यान सचिन (भैय्या) थोरात, योगेश (भैय्या) मोटे तसेच विक्रम (पंत) थोरात या तिघांचा पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार आहे.
पक्षप्रवेश अगोदर शहरातून मोठ्या प्रमाणात भव्य युवक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या बाईक रॅली मध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.आणि यांच्या समवेत सचिन (भैय्या) थोरात, योगेश (भैय्या) मोटे व विक्रम (पंत) थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.