लाटेची मच्छी लईच भारी…! खवय्यांसाठी..!!

0
49

लाटेची मच्छी लईच भारी…! खवय्यांसाठी..!!

बारामती-फलटण परिसरातील खास ठिकाण
बारामती-फलटण मार्गावर मच्छीप्रेमींसाठी एक नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे, ते म्हणजे “इंद्रजीत मच्छी खानावळ, लाटे”. चविष्ट आणि घरगुती पद्धतीने बनवलेल्या मच्छीच्या विविध पदार्थांमुळे या खानावळीची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे.
बारामती, फलटण आणि आसपासच्या गावांमधून अनेक खवय्ये खास मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात. सुट्टीचे दिवस असोत किंवा आठवड्याच्या शेवटी, येथे ग्राहकांची नेहमीच भरगच्च गर्दी पाहायला मिळते. एकदा चव चाखलेली मंडळी पुन्हा-पुन्हा येथे येत असल्याचे चित्र दिसते.


खमंग मसाल्यात मुरवलेली ताजी मच्छी, झणझणीत कालवण, कुरकुरीत फ्राय आणि गरमागरम भाकरी किंवा भात यांचा संगम ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे घरगुती चवीचा आग्रह आणि दर्जेदार सेवा यामुळे या खानावळीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्थानिकांसह दूरवरून येणारे ग्राहक येथे मनमुराद मच्छीवर ताव मारताना दिसतात. त्यामुळे “मच्छी खायची तर लाटेलाच जायचं” अशी चर्चा खवय्यांमध्ये रंगू लागली आहे.

Screenshot_20260617-234204_Photos


मच्छीप्रेमींनी एकदा तरी भेट द्यावी असे हे ठिकाण सध्या परिसरातील खाद्यप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
– खवय्यांसाठी खास लाटे तालुका बारामती येथील इंद्रजीत मच्छी खानावळ, एकदा भेट द्या आणि चवीचा अनुभव घ्या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here