बारामतीतील ०९ विद्यार्थ्यांची तोशिबा मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडस्ट्रियल सिस्टिम कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड…!

बारामतीतील ०९ विद्यार्थ्यांची तोशिबा मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडस्ट्रियल सिस्टिम कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड...!

0
75

विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान बारामती येथील महाविद्यालयाच्या ०९ विद्यार्थ्यांची तोशिबा मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडस्ट्रियल सिस्टिम कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या कंपनीने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रिकल या दोन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन सदर विद्यार्थ्यांची ४.५ लाखाच्या वार्षिक पॅकेजसाठी निवड केली आहे. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनच्या चैतन्य गोरे, ओम मोहिते, पायल गोलांडे व इलेक्ट्रिकल शाखेच्या मयूर कोकरे, ओंकार पिल्लेवार, रोहित बोराडे, सानिका शेडगे, शंतनू पांडव, स्नेहा जगताप यांची निवड झाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, डॉ. विशाल कोरे, प्रा. सुरज कुंभार, प्रा. दीपक येवले, प्रा. मयूर गावडे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कामासाठी चारुदत्त दाते व प्रवीण नगरे यांचे सहकार्य लाभले. विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य यांनी या यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here