Homeबातम्याबारामती हाफ मॅरेथॉन बारामतीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गाजली...

बारामती हाफ मॅरेथॉन बारामतीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गाजली…

बारामती हाफ मॅरेथॉन बारामतीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गाजली...

बारामती हाफ मॅरेथॉनला बारामतीकरांनी दिला उदंड प्रतिसाद तर लहान थोरापासून ज्येष्ठापर्यंत अनेकांनी आपापल्या परीने सर्वांना एकत्रित करून बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंग बांधला तो आज सक्सेस ठरलेला आहे. परदेशी खेळाडूंनीही दिली भरभरून दाद…

ऑलिंपिक विजेत्या मुष्टीयुध्दपटू मेरी कॉम ने सागितले गुड रहस्य..

कष्ट करण्याची तयारी असेल व परिश्रमांची जोड असेल तर यश संपादन करणे अवघड नसते, असे प्रतिपादन ऑलिंपिक विजेत्या मुष्टीयुध्दपटू मेरी कोम यांनी केले मेरी कोमचां आनंद मध्ये त्यांनी विविध टिपण्या करून बारामतीकरांच्या व विविध रनरस च्या मनात आपले घर केले …

कष्ट करण्याची तयारी असेल व परिश्रमांची जोड असेल तर यश संपादन करणे अवघड नसते, असे प्रतिपादन ऑलिंपिक विजेत्या मुष्टीयुध्दपटू मेरी कोम यांनी केले. शरयू फाऊंडेशन व बारामती रनर्स यांच्या वतीने रविवारी (ता. 11) आयोजित करण्यात आलेल्या बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिकवितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.

शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, उद्योजक श्रीनिवास पवार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मेरी कोम यांच्या हस्ते, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. या वेळी सुप्रिया सुळे यांनीही फनरनमध्ये सहभागी होत मॅरेथॉनचा आनंद लुटला.

पारितोषिक वितरण समारंभास अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, चोला एम.एस.चे उपाध्यक्ष विवेक चंद्रा, सरव्यवस्थापक मन्सूर अली, राजीव देशपांडे, अजय पुरोहीत, कुणाल शर्मा,

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, पोलिस निरिक्षक दिनेश तायडे, बारामती रनर्सचे डॉ. वरद देवकाते, अमोल वाबळे, अँड. रोहित काटे उपस्थित होते.

ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ….
ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व मैदान प्राप्त करून देणे त्याचप्रमाणे आरोग्याचा जनजागर करण्यासाठी बारामती हाफ मॅरेथॉनचा उपक्रम सुरु केला आहे- शर्मिला पवार, अध्यक्षा, शरयू फाऊंडेशन.

विजेते खेळाडू –(प्रथम, द्वितीय तृतीय या क्रमाने)
21 किलोमीटर (परदेशी खेळाडू पुरुष)- अडणीव टोलेसा, एकेले निगुसे, मगासे सोरा.

21 कि.मी. (परदेशी महिला खेळाडू)- हिलंडा तनई, बिर्गिड किमतवाई

21 कि.मी. पुरुष (खुला गट)- अंकुश हालके, मनीष राजपूत, विशाल गंभीरे.

21 कि. मी. स्त्री (खुला गट)- राणी मचनंदी, आकांक्षा शेलार, वैष्णवी मोरे

10 कि.मी.- पुरुष- सुनील कुमार, महादेव कोळेकर कृपाशंकर यादव

10 कि. मी.महिला- प्राजक्ता शिंदे, सुरेखा मदने, दीक्षा लोणार

जवळपास सहा हजार स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. शुभम निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल रुपनवर, चैतन्य राठी यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. पी. एन देवकाते यांनी आभार मानले.

आफ्रिकन खेळाडू पेक्षा भारतीय खेळाडूंनी या वेळेस बाजी मारली तर हरियाणा मधील 65 वर्षीय भजनलाल व त्यांचा मुलगा 32 वर्षीय हरभजन या पिता पुत्राच्या जोडीने स्पर्धा पूर्ण केली. त्या नंतर त्यांनी भांगडा करुन आनंद व्यक्त केला. काही महिलांनी थेट नऊवारी घालून स्पर्धेत भाग घेतला.

मी पुन्हा येईन ….
प्रापंचिक जबाबदारी सांभाळून सराव केला, पतीने सहकार्य दिले, ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदकाचीच जिद्द होती, मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले ही खंत आहे. सराव शिवाय यश नाही.

बारामतीचे वातावरण, पर्यावरण व नियोजन खूप छान आहे, मला पुन्हा बारामतीला यायला आवडेल- मेरी कोम, ऑलिंपिक विजेती मुष्टीयुध्दपटू. यांनी शब्ध दिला…

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on