Homeबातम्याविद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट नेतृत्वकला विकसित होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे :अविनाश सावंत

विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट नेतृत्वकला विकसित होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे :अविनाश सावंत

विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट नेतृत्वकला विकसित होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे :अविनाश सावंत

विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट नेतृत्वकला विकसित होण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे :अविनाश सावंत

” उत्कृष्ट नेतृत्व कला विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये व्यासपीठ मिळवून देणे महत्त्वाचे आहे” असे प्रतिपादन रेडिओ रागिनी आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी अविनाश सावंत सर यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयातच नेतृत्व कला संभाषण कला आणि व्यासपीठावर बोलण्याची कौशल्य आत्मसात करता यावीत याकरिता रेडिओ रागिनी या इंटरनेट रेडिओच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांमध्ये करण्यात आल्याचे रेडिओ रागिणीच्या (इंटरनेट) संचालिका राजश्री आगम यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी बारामती तालुक्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
‘पालकांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक अनुभव मिळावेत याकरिता वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.’ असे मत यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक डॉ. प्रकाश खोत यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेमध्ये अनुक्रमे पहिली ते चौथी या गटामधून -प्रथम क्रमांक-
शिवांजली गणेश भोसले, महात्मा गांधी बालक मंदिर, द्वितीय क्रमांक- स्वरांजली सागर शिर्के सरस्वती विद्यामंदिर पणदरे, तृतीय क्रमांक – स्वरांजली संजय पवार महात्मा गांधी बालक मंदिर, उत्तेजनार्थ -इर्शिता स्वप्निल चव्हाण, विद्या प्रतिष्ठान सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूल व शिवन्या शरद तनपुरे यामध्ये विभागून देण्यात आला.
पाचवी ते सातवी या मोठ्या गटामधून प्रथम क्रमांक-अथर्व गोरख शिर्के, नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे, द्वितीय क्रमांक – जिया फिरोज तांबोळी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक- वैष्णवी लक्ष्मण कुंभार आर.एन अगरवाल टेक्निकल हायस्कूल, उत्तेजनार्थ- स्वानंद सुनील गोखले, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा, व विरजा विजय नीलाखे, शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर. क्रमांक देण्यात आले.
कौटुंबिक, सामाजिक व वास्तव विषयावर विद्यार्थ्यांना आपली मनोगत व्यक्त करता येईल असे विषय निवडण्यात आले होते. या स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणाचे काम अविनाश सावंत सर, डॉ.प्रकाश खोत सर, प्रा. अजय शिंदे यांनी पाहिले. या कार्यक्रमासाठी एक्सलन्स सायन्स अकॅडमी चे प्रमुख गौरव गुंदेचा चा उपस्थित होते. त्यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम मल्हार क्लब भिगवण रोड बारामती येथे संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी सुजाता लोंढे, ऋतुजा आगम,साक्षी आंबेकर, पूजा बोराटे, सुप्रिया बनकर यांचे योगदान लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
रागिणी फाऊंडेशनच्या सदस्या ज्योती बोधे यांनी केले तर आभार प्रदर्शन घनश्याम केळकर यांनी केले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on