बारामतीत संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न

0
9

संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न

बारामती : बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने श्री संतश्रेष्ठ सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी वीरभाई कोतवाल हाउसिंग सोसायटी, भिगवण रोड, बारामती येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास तालुक्यातील नाभिक समाजबांधव, महिला तसेच बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संतश्रेष्ठ सेना महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक, सत्यनारायण महापूजा तसेच विजय चौधरी व ज्ञानेश्वर भजनी मंडळ, सूर्यनगरी बारामती यांच्या भक्तिमय भजनाने झाली. दुपारी १२ वाजता संत सेना महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून विधिवत आरती करण्यात आली.
यानंतर ह. भ. प. दत्तात्रय महाराज राऊत महाराज तावशीकर यांचे समाजप्रबोधनपर सुश्राव्य कीर्तन झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी संत सेना महाराजांचे जीवनकार्य, त्यांची भक्ती, कर्म, सेवा, समता आणि माणुसकीचा संदेश उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडला. आजच्या पिढीने संतांच्या विचारांचा केवळ गौरव न करता ते आपल्या आचरणात आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कीर्तनाला मृदंग आचार्य अनिकेत शिंदे महाराज यांची मृदंग साथ, अशोक मोहिते चोरमुले महाराज यांचे गायन तसेच ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, भाडळी बुद्रुक येथील भक्तगणांची साथ लाभली. टाळ-मृदंगाच्या गजरात उपस्थित भक्तगणांनी नाचत-गात भक्तिरसाचा आनंद घेतला.


यावेळी बारामती तालुका नाभिक संघटनेसह समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर जळोची ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त तथा माजी बारामती पंचायत समितीचे गटनेते दीपक मलगुंडे आणि बारामती नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अभिजीत जाधव यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये नारायण लक्ष्मण वाघमारे, हेमंत मच्छिंद्र जाधव, राजेश पिराजी शिंदे, संतोष ज्ञानदेव सपकाळ, अनिल दामोदर दळवी, महेंद्र विश्वनाथ यादव, राधेश्याम विनायक साळुंखे, सुधाकर मधुकर माने, नवनाथ नारायण आपुणे, शहाजी पिराजी शिंदे, दिगंबर संभाजी काशीद, प्रल्हाद लक्ष्मण राऊत, शंकरराव लक्ष्मण यादव, देविदास त्रिंबक वाघमारे, परशुराम सदाशिव गायकवाड, राजेश विठ्ठल दळवी, सचिन विठ्ठल यादव आणि महेश दगडू वारुळे यांचा समावेश होता.
यापैकी अनिल दामोदर दळवी यांनी श्री संत सेना नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच बारामती तालुका नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. महेंद्र विश्वनाथ यादव हे श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन तसेच बारामती तालुका नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. राधेश्याम विनायक साळुंखे यांनी भाई कोतवाल हाउसिंग सोसायटीचे माजी चेअरमन आणि बारामती तालुका नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मा चेरमन सूर्यवंशी वीरभाई कोतवाल सोसायटी
नवनाथ नारायण आपुणे हे बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे अध्यक्ष, श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन तसेच बारामती तालुका नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. तर महेश दगडू वारुळे हे श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन तसेच बारामती तालुका नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.
यावेळी बारामती नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अभिजीत जाधव यांनी नाभिक समाजाला संबोधित करताना सांगितले की, स्व. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून नाभिक समाजासाठी झालेली विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. समाजाच्या प्रलंबित विकासकामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बारामती तालुका नाभिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष रोहन शहाजी शिंदे यांच्यासह अजित सुभाष यादव, अनंत नारायण आपुणे, शिरीष मोहन काशीद, आदेश संजय आपुणे आणि ओंकार भारत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संघटनेचे सर्व कार्यकारी पदाधिकारी, माजी अध्यक्ष तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी केले
संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दिवसभर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित समाजबांधवांनी संत सेना महाराजांचे मनोभावे स्मरण करून त्यांच्या विचारांचा संदेश आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित समाजबांधवांसाठी सामुदायिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सामुदायिक भोजनाने या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण सोहळ्याची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here