बारामती एमआयडीसीतील प्रश्नांबाबत बैठक घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत

0
3

बारामती एमआयडीसीतील प्रश्नांबाबत बैठक घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत

बारामती व पणदरे एमआयडीसी मधील अनेक प्रश्न व प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बारामती विमानतळावर उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, कार्यकारिणी सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने उद्योजक राहुल लावर तसेच प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेटकर याप्रसंगी उपस्थित होते.

धनंजय जामदार म्हणाले बारामती व पणदरे एमआयडीसी मधील उद्योगांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच अखंड पाणी व वीज पुरवठा, लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट, घनकचरा व्यवस्थापन याबाबतचे प्रस्ताव बिडा असोसिएशनने उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून शासनाकडे सादर केले आहेत. त्यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उद्योगमंत्र्यांकडे करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here