पंजाब नॅशनल बँकेच्या बारामती MIDC शाखेचे उद्या उद्घाटन

0
2

पंजाब नॅशनल बँकेच्या बारामती MIDC शाखेचे उद्या उद्घाटन

बारामती : पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्या नव्या बारामती MIDC शाखेचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १७ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता MIDC बारामती (एअरपोर्ट रोड), ता. बारामती, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडचे CMD तथा ADT बारामतीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन (BIDA) चे अध्यक्ष श्री. धनंजय एस. जमदार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमास पंजाब नॅशनल बँकेचे मुंबई विभाग (महाराष्ट्र व गोवा) विभागीय व्यवस्थापक तथा मुख्य महाव्यवस्थापक (CGM) श्री. दीपक कुमार श्रीवास्तव हे मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बारामती MIDC परिसरातील उद्योग, व्यावसायिक व ग्राहकांना अधिक सक्षम आणि आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही शाखा सुरू करण्यात येत असल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली.


या कार्यक्रमासाठी शाखा प्रमुख श्री. निलेश खाडे तसेच सर्कल कार्यालय, पुणे येथील सर्कल प्रमुख श्री. देवेंद्र सिंह यांनी नागरिक, उद्योजक व ग्राहकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Previous articleबारामतीच्या कन्येची भारतीय महिला अंडर-19 क्रिकेट संघात निवड; श्रीलंका दौऱ्यासाठी संधी..!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here