झी टॉकीज टीव्ही कीर्तनकार ह.भ.प. सौ. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत यांच्या अमृतमय कीर्तनाने माऊलींची नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली!

0
3

झी टॉकीज टीव्ही कीर्तनकार ह.भ.प. सौ. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत यांच्या अमृतमय कीर्तनाने माऊलींची नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली!

प्रतिनिधी:
वडमुखवाडी आळंदी येथे एकादशीनिमित्त थोरल्या पादुका मंदिरात रंगली अविस्मरणीय कीर्तनसेवा
आळंदी देवाची : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर, वडमुखवाडी, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे येथे एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्ती, ज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.


या भव्य-दिव्य मंदिरात झी टॉकीज टीव्ही कीर्तनकार, अध्यात्मभूषण ह.भ.प. सौ. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत यांना कीर्तनसेवेचे परमभाग्य लाभले. त्यांच्या ओघवत्या वाणीतून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा, भक्तीचा आणि अध्यात्माचा सुंदर जागर करण्यात आला.
ताईंच्या भावपूर्ण निरूपणाने आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या अभंगांनी उपस्थित भाविकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांच्या कीर्तनातून संतविचारांची झालेली उधळण ऐकताना भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. माऊलींच्या चरणी अर्पण झालेल्या या सेवेमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या सुंदर कीर्तनसेवेला गायक, संगीत विशारद श्री. भागवत महाराज भाग्यवंत यांची सुरेल आणि प्रभावी साथ लाभली. त्यांच्या मधुर गायनाने कीर्तनातील भक्तिरस अधिक खुलून आला. बालगायिका कु. कैवल्याताई भागवत भाग्यवंत हिनेही आपल्या गोड आणि सुमधुर आवाजाने उपस्थितांची मने जिंकली.
तर पखवाज वादक पुरुषोत्तम महाराज पांचाळ यांच्या दमदार पखवाज साथीने कीर्तनाला विशेष रंगत आली. तसेच श्री हरीप्रिया महिला भजनी मंडळ, दिघी यांनी आपल्या मधुर भजनसेवेने संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन काढले.
अभंग, नामघोष आणि संतवाणीच्या स्वरांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. “ज्ञानोबा माऊली… ज्ञानोबा माऊली…” या जयघोषाने वातावरण भारावून गेले. अनेक भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि प्रत्येकाच्या मनात माऊलींच्या चरणी भक्तिभाव जागृत झाला.


या पवित्र आणि संस्मरणीय कीर्तनसेवेच्या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर समितीच्या वतीने झी टॉकीज टीव्ही कीर्तनकार ह.भ.प. सौ. भाग्यश्रीताई भागवत भाग्यवंत, गायक संगीत विशारद श्री. भागवत महाराज भाग्यवंत, बालगायिका कु. कैवल्याताई भागवत भाग्यवंत, पखवाज वादक पुरुषोत्तम महाराज पांचाळ तसेच श्री हरीप्रिया महिला भजनी मंडळ दिघी यांचा सन्मान करण्यात आला.
संतांच्या भूमीत सेवा करण्याचे भाग्य लाभणे हीच मोठी साधना आणि माऊलींच्या चरणी आपल्या कलेतून भक्ती अर्पण करण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील अनमोल क्षण!
माऊलींच्या चरणी अर्पण झालेली सेवा ही केवळ सेवा नसते; ती भक्तांच्या हृदयात कायमची जपली जाणारी एक सुंदर आठवण असते.
एकादशीच्या या पावन पर्वावर झालेल्या या कीर्तनसेवेने वडमुखवाडीतील थोरल्या पादुका मंदिराचा परिसर भक्ती, ज्ञान, नामस्मरण आणि भावनेने अक्षरशः उजळून निघाला.

Previous articleहसवत हसवत जीवनाची शिकवण; दुसऱ्याच्या आनंदातच खरा आनंद : जयवंत आवटे
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here