Homeलेखआदरणीय,शरदचंद्रजी पवार साहेब,साहेब,आपल्या बद्दल आम्हाला आदर...!

आदरणीय,शरदचंद्रजी पवार साहेब,साहेब,आपल्या बद्दल आम्हाला आदर…!

आदरणिय,
शरदचंद्रजी पवार साहेब,
साहेब,
आपल्या बद्दल आम्हाला आदर आहे.भविष्यात हि राहील.आज आपण एका कसोटीच्या काळात आहात अशा काळात आम्ही मनापासून आपले सांत्वन करीत आहोत.

आज आपण या शाहिरी प्रमाणे एका दिव्यातुन जात आहात.हमे तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था,
मेरी किश्ती जहाँ डूबी वहाँ पानी कम था..!!
आपनोने हि आपको लुटा हम आपके लिये गैर थे!
लेकीन अब हम ना.आपके ना होते हुये भी सब कुछ कर सकते हैं बहुत कुछ कर सकते !

आम्ही आपला आदर करीत होतो.परंतु आपण आमचा अनादर करीत होता.याच आदर आणि अनादर मधील छोटीशी रेषा पुढे मोठी मोठी होत गेली.तिचा स्फोट झाला
मांग मग तो मांगरामोशी असो डक्कलवार असो. गारुडी असो मांग म्हणुन जन्माला आला त्याने आपणाला शाप दिला.असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

आपण नास्तिक आहात हे मला मान्य आहे तरी मी आपणास विनंती करील आपण मांगाच्या इतिहास पहा.ज्या परशुरामाचा पुत्र जमदग्नीने मातेचे शीर छाटले त्या शिराच्या जागेवर मांगणीचे शिर आहे.जो जमदग्नी शीघ्रकोपी होता.त्याने शिर बसवले‌ती मांगिण काही अंशी का होईना निश्चितच शीघ्र कोपी असणारच तेव्हा शाप कसा प्रखर असु शकतो.

जिथे (तळतळाट) शाप आहे तिथे उःशाप हि आहे.आपण पश्चात्ताप करीत असाल तर पश्चात्ताप हे पापाचे क्षालन आहे.भविष्यातील मांगाना बद्दल भावना आपलेपणाच्या दाखवा.निश्चितच उःशाप मिळेल.

काॅग्रेस.भाजप,शिवसेना यांनी मांगाना आपल्या पेक्षा झुकते माप दिले.शिवसेने तर एक राज्यमंत्रीपद देखील दिले.

आपण देखील मांगाला मंत्रीपद दिले हे आम्ही मान्य करतो‌.परंतु ते मांगाच्या भल्यासाठी नाही तर मांगाना कुजविण्यासाठी दिले.मांगाचे निष्पाप खासदार हे जनतेच्या प्रेमापोटी सात वेळा निवडुन येत होते. आपण त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.परंतु अनेक वेळा अपयश आले.शेवटी आपण त्यांचे खच्चीकरण केले.

उलट पक्षी आदरणिय विलासरावानी इचलकरंजीचा मांगाला लातुर मधुन निवडुन आणले

वंदनिय अण्णाभाऊ यांच्या नावाने असणाऱ्या महामंडळाची वाट कशी लावली.कित्येक वर्ष मांग हा शासकिय लाभापासून वंचित आहे.मांगाना देण्या ऐवजी आपण हिसावुनच घेत आला
मांग शाप देणार नाही तर काय? वंदनिय आण्णा भाऊचा स्मारक वंदनीय आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक बद्दल आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे आयोग कधीच भुमिका घेतली नाही.

माझ्या सारखा निष्पाप माणुस आपण पुलोदच्या माध्यमातून मुख्यमंत्री झालात.मी आपले अभिनंदन केले हातभर पत्र आपण हि पाठविले.आपण खासदारकीच्या निवडणुका लढवित होता.आम्ही पदरमोड करुन घरावर भोंगे झेंडे लावत होतो.भिंती रंगवत होतो.घरच्या भाकरी बांधुन पायी प्रचार करीत होतो.आपल्यासाठी पक्ष कार्यासाठी मी नोकरी सोडायला तयार झालो.परंतु आपण मला लेखी सल्ला दिला नोकरी संभाळुन पक्ष कार्य करा.येथे माझी जात पाहीली परंतु इतरांची जात पाहुन वाचाळवीर ज्यांच्यामुळे पक्षाचे नुकसानच होत होते.असे पक्षात घेतले.

मग चातुवर्ण व्यवस्था राबवली जाते.त्यात काय फरक तसेच तुम्ही आमच्या साठी काम करा परंतु आमच्या जवळ येऊ या‌ मानसिकतेत व आपणात काय फरक मी तर एक सामान्य आहे.भले‌भले‌ राजकारणी जाहिर बोलतात.आपण जातीवादी आहात बदला खरे राष्ट्रवादी व्हा.

आपण पुणे जिल्ह्यातले‌ परंतु आद्यक्रांती गुरु लहुजी यांचे स्मारकावर नतमस्तक होण्यासाठी एकदाही आला नाही उलट पक्षी आद.देवेंद्र फडणीस आले नत मस्तक झाले हरलेली बाजी त्यांनी जिंकली आद.अजितदादा स्मारकासाठी निधी दिला ध्रुव सारखे त्यांचे पद अढळ आहे.हा मांगाचाउःशाप

आपण आद्यक्रांती गुरु लहुजीच्या स्मारकाच्या येथे‌ नतमस्तक व्हा.प्रायश्चित करा.पहा उःशाप मिळेल.
वंदनिय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात पहिला वंदनीय आण्णा भाऊचा पुतळ्याचे पुण्यात प्रतिष्ठान केले.मांग आजही त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणुन प्रार्थना करतात ते अजरामर आहेत.

आपण आता मांगा‌बद्दल ठोस भुमिका घ्या.राष्ट्रवादी असो वा आघाडी २९ राखीव जागे मधील किमान १० जागा मांगाना द्याच त्या निवडुन आणा लोकसभेच्या ५ पैकी ३ जागा मांगाना द्या निवडुन आणा मांग निवडून येणारच मांगाला उमेदवारी दिली व‌‌ त्याचा पराभव झाला असं एखादं अपवादत्मक उदा असेल‌

मांग हा बहुजनामध्ये आपलासा वाटणारा, वचनाला जागणारा समाज घटक आहे.यश निश्चितच केवळ मांगानाच नाही तर आपल्या आघाडीला.देखील यश मिळणारच.हाच खरा उ:शाप ठरेल.
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता
शंकरभाऊ तडाखे संस्थापक अध्यक्ष आद्यक्रांती गुरु लहुजी सेना ( राष्ट्रवादी पक्षाचे क्रियाशील वंचित राहिलेले सदश्य (

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on