HomeUncategorizedआज बारामतीत कजाकिस्तान येथे ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या आठ जाबाज जवान "आयर्नमॅन "चे...

आज बारामतीत कजाकिस्तान येथे ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या आठ जाबाज जवान “आयर्नमॅन “चे भव्य स्वागत , मिरवणूक, सत्कार समारंभ….!

बारामती (भावनगरी )प्रतिनिधी : आज बारामतीत कजाकिस्तान येथे ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या आठ जाबाज जवान “आयर्नमॅन “चे भव्य स्वागत , मिरवणूक, सत्कार समारंभ….!
बारामती :(भावनगरी) प्रतिनिधी :
बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या ०८ सदस्यांनी २ जुलै रोजी कझाकीस्थान येथे पार पडलेल्या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत , आयर्नमॅन खिताब मिळवला.
या सर्व आयर्नमॅनस् चे स्वागत , मिरवणूक , सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले आहे.तरी
याप्रसंगी , आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. बारामतीत आज सोमवार.१० रोजी…
मिरवणूक प्रारंभ सायंकाळी ४:०० वाजता स्थळ शिवाजी उद्यान , कसबा मिरवणूक मार्ग छत्रपती शिवाजी उद्यान – कारभारी सर्कल – डेंगळे गार्डन मंगल कार्यालय मिरवणुकीनंतर ,लगेचच_ सत्कार सायंकाळी ६:०० तरी या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थिती रंजीत आण्णा पवार अध्यक्ष – बारामती औद्योगिक वसाहत यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.
स्थळ – डेंगळे गार्डन मंगल कार्यालय
निरा-बारामती रोड , विठ्ठल प्लाझा शेजारी , बारामती
बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा बारामती पहिले आयर्नमॅन सतिश ननवरे आणि आयर्नमॅन किताबाचे कझाकिस्तान येथे मानकरी ठरलेले अजिंक्य साळी ,वैष्णवी ननवरे,सादिया सय्यद, मच्छिंद्र आटोळे, राहुल मोकाशी, तुषार चव्हाण, रजनीश गायकवाड ,राहुल पाटील व मार्गदर्शक आयर्नमॅन सतीश ननवरे सर या सर्वांचे साप्ताहिक भावनगरी व शिंदे परिवाराच्या वतीने खूप खूप सर्वप्रथम अभिनंदन ….! बारामतीचे वरील ०८ जवान बारामती स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून कजाकिस्तान येथे आयर्न मॅन स्पर्धेकरिता गेले होते.व आयर्नमॅन हा किताब पटकावलेले ते ०८ बारामती स्पोर्ट फाउंडेशनचे वीर न्यू आयर्नमॅन यांची सोमवार रोजी जंगी मिरवणूक व सत्कार
कझाकिस्तानमधून आयर्न मॅनचा किताब घेऊन बारामतीचे ०८ वीर उद्या बारामती दाखल होत असून आज सोमवार दि. १० जुलै संध्याकाळी ४ वाजता शिवाजी उद्यान कसबा येथून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

बारामतीच्या शहरात वाजत- गाजत मिरवणूक काढली जाणार आहे .या सात वीरांनी बारामती स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून ०२ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण केली. आयर्नमॅन होण्याकरिता पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही (मोमेंट ) एका पाठोपाठ करायच्या असतात. ०४ किलोमीटर पोहणे तर १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर हे वरील वीर धावले . व कजाकिस्तान येथे ह्या सर्व जणांनी आयर्नमॅनचा किताब जिंकून आलेले . याकरिता त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत.

बारामतीत या सात वीरांनी आयर्नमॅनचा किताब जिंकताना बारामतील युवकांसमोर आदर्श ठेवला आहे.

त्यांच्या मिरवणूक व सत्कार सोहळ्याला जास्तीत जास्त सायकलपट्टू, खेळाडू, क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,

असे आवाहन तमाम बारामतीकरांच्या माध्यमातून तर बारामती स्पोर्ट फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on