HomeUncategorized(IRA) नवी दिल्ली च्या महाराष्ट्र राज्यातील ११ पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

(IRA) नवी दिल्ली च्या महाराष्ट्र राज्यातील ११ पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

(ARI) नवी दिल्ली च्या महाराष्ट्र राज्यातील ११ पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी:- माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार सेना तथा इंडिया ट्वेंटी फोर न्यूज च्या वतीने वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर येथे महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा दिनांक 5 मार्च रोजी कर्मवीर कन्नमवार सभागृह चंद्रपूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक माननीय डॉक्टर अविनाश जी सकुंडे सदस्य अल्पसंख्याक आयोग भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुखातिथी आमदार किशोर भाऊ जोरगेवार विजयकुमार खंडारे संजय कुमार कोटेच्या इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जितेंद्र जी चोरडिया अध्यक्ष डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे संयोजक तुळशीरामजी जांभुळकर यांच्या परिवाराच्यावतीने करण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रगीताने सुरुवात झाली त्यानंतर सन्माननीय अतिथी गण यांचे स्वागत व सत्कार करण्यात आली त्यामध्ये इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले तर नंतर राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले यावेळी सर्वप्रथम सांगलीच्या श्रीदेवी पाटील इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विटा जिल्हा सांगली येथील राजनंदिनी ड्रायव्हिंग स्कूल च्या प्रोप्रायटर व सामाजिक कार्यकर्त्या शीला प्रवीण शिंदे यांना क्रांतिवीर बिरसा मुंडा योद्धा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांगली मिरज येथील स्वप्नाली श्रीकांत सातपुते या महिला उद्योजिका यांना अहिल्याबाई होळकर सेवावृत्ती महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल सुरेश शिंदे यांना रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्ररत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. लातूर येथील शिवाजीराव निलंगेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत राजाराम वाकळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित केले. बारामती जिल्हा पुणे येथील इंडियन रिपोर्टर असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य सचिव व सामाजिक धार्मिक पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल संतोष नारायण शिंदे यांना रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज योद्धा महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला. परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मदन बापू कोल्हे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंगोली येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व इरा चे हिंगोली जिल्हाध्यक्ष उत्तम प्रलादराव धायजे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला. सांगली येथील युवा रत्न अजिंक्य शंकराव ताटे यांना महाराष्ट्र भूषण युवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगली नगरीतील सपना पाटील यांना सामाजिक कार्याबद्दल राणी लक्ष्मीबाई शूरवीरता महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्ली व महिला उन्नती संघ नवी दिल्ली या संस्थांचे वरील सर्व पदाधिकारी सदस्य असून वेगवेगळी पदे भूषवित आहेत. या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मार्गदर्शक म्हणून इंडियन रिपोर्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांनी मोलाची कामगिरी बजावली. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उद्योजक पत्रकार मित्र पोलीस मित्र व इतर मान्यवर यांनाही वेगवेगळे आपापल्या क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमाचे समापन सुरुची भोजनाने झाले होते

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on