कचरा गाडी कचऱ्याने फुल्ल!

0
5

कचरा गाडी कचऱ्याने फुल्ल!

बारामती: एमआयडीसी प्रशासनाने आता तरी जागे व्हावे; स्वतंत्र कचरा गाड्यांची मागणी जोर धरू लागली!
नगरपरिषदेवर अवलंबून न राहता एमआयडीसीने स्वतःची कचरा गाडी सुरू करावी; वाढत्या लोकवस्तीमुळे जुन्या गाड्या अपुऱ्या!
एमआयडीसी परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. काल आलेली कचरा गाडी संपूर्ण कचऱ्याने भरलेली होती. वाढती लोकवस्ती आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा पाहता, सध्याच्या जुन्या गाड्यांमधून संपूर्ण परिसरातील कचरा उचलणे शक्य होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
एमआयडीसी प्रशासनाने नगरपरिषदेवर अवलंबून न राहता स्वतःची स्वतंत्र कचरा गाडी सुरू करावी, अशी मागणी काल संबंधित एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. परिसरात दररोज नियमित कचरा संकलन व्हावे, यासाठी एमआयडीसीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
पूर्वीच्या तुलनेत लोकवस्ती आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असताना जुन्या आणि अपुऱ्या कचरा गाड्यांवर अवलंबून राहणे कितपत योग्य, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन कचरा गाड्यांची व्यवस्था करावी आणि कचरा संकलनासाठी पुरेशी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता तरी एमआयडीसी प्रशासन लक्ष देणार का? स्वतंत्र कचरा गाडी सुरू करून नागरिकांना नियमित कचरा संकलनाची सुविधा मिळणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous articleसोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here