सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क…!
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज दि. ११ रविवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाही प्रक्रियेत मतदानाला विशेष महत्त्व असून, सहकारी साखर कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये मतदानाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.




