पुरंदर काँग्रेसचा ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ला बिनशर्त पाठिंबा

0
5

पुरंदर काँग्रेसचा ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ला बिनशर्त पाठिंबा

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरंदरमधील राजकीय गणिते बदलणार?

सासवड : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीने ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. संभाजी जयवंतराव जगताप यांच्या स्वाक्षरीचे पत्र कारखाना प्रशासनाला देण्यात आले आहे.

या पत्रामध्ये श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ला काँग्रेस पक्षाच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतकरी, कामगार आणि कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी या पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. काल बारामती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुनेत्रा पवार यांना पुरंदर तालुक्याचा पाठिंबा म्हणून दत्ताशेठ झुरंगे यांनी पाठिंबा दिला होता झुरंगे यांच्याकडे कुठलेही पद सध्याला नाही त्यांचा तो वैयक्तिक पाठिंबा असेल काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही असे तालुकाध्यक्ष संभाजी राजे जगताप यांनी सांगितले

कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुरंदर तालुका काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पुरंदर तालुक्यातील सभासद मतदारांमध्ये काँग्रेसच्या या भूमिकेचा कितपत परिणाम होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलला काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने निवडणुकीतील लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात अन्य राजकीय पक्ष व स्थानिक नेते कोणती भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी राजे जगताप, बारामती तालुकाध्यक्ष वैभव बुरुंगुले उपस्थित होते

Previous articleसोमेश्वरच्या राजकारणात भूकंप!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here