विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने डॉ. सौरभ मुथा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

0
6

डॉ. मुथा सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बारामती : कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ जिव्हाळा, कृतज्ञता आणि आपुलकीची भावना म्हणून डॉ. मुथा सरांचा वाढदिवस विष्णुपंत चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मित्र मंडळाच्या वतीने केक कापून डॉ. मुथा सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा प्रेरणादायी फोटो भेट देण्यात आला. याशिवाय कुकर व जर्किंग कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. मुथा सरांच्या कुटुंबीयांनी भावनिक होत मित्र मंडळाचे आभार मानले. “अशा प्रकारे निस्वार्थ प्रेम करणारी माणसं आज फार कमी आहेत,” अशी भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.


कार्यक्रमास उपकारदाता अॅड. सुधीरजी पाटसकर साहेब, अन्नदाता व सभापती सत्यव्रत अर्जुनराव काळे, पत्रकार तैनुरभाई शेख, अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे, अमित भैय्या बगाडे, सुप्रसिद्ध फोटोग्राफर प्रशांत मामा कुचेकर, पवनराजे बनसोडे, गरुड कमांडो नेताजी बुरुंगले (फौजी), नरेंद्र भाऊ मिसाळ, मेंबर विठ्ठल शेठ आगवणे, ओंकार शेठ राऊत, चेतन शेठ वाडेकर, विनोद भैय्या हिंगमिरे तसेच विष्णुपंत चव्हाण यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.
या उपक्रमातून वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव न राहता माणसांमधील प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा दिवस ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous articleबारामती एमआयडीसी च्या साईनगर परिसरात १२ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ…!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here