बारामती एमआयडीसी च्या साईनगर परिसरात १२ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ…!

0
4

बारामती एमआयडीसी परिसरात १२ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ…!

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरातील साईनगर येथे आज सकाळी एका १२ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री आईसोबत झालेल्या भांडणानंतर मुलगी घराबाहेर पडली होती. त्यानंतर सकाळी तिचा मृतदेह साईनगर परिसरात आढळून आला.
मृत्यू नेमका कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बारामती मेडिकल कॉलेज येथे जाऊन डॉक्टरांशी पोस्टमार्टम अहवालाबाबत चर्चा केली. तसेच त्यांनी डीवायएसपी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशीही चर्चा करून तपासाबाबत माहिती घेतली.
मृत मुलगी ही रोहित पवार यांचे निकटवर्तीय स्वीय सहाय्यक अजित यांच्या कुटुंबातील असल्याची माहिती आहे. या दुःखद घटनेबद्दल पवार कुटुंबीय संबंधित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
“या प्रकरणाचा तपास अत्यंत शिताफीने आणि कोणतीही हलगर्जी न करता करण्यात यावा. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम व पोलीस तपासातून स्पष्ट होईल. पोलिसांनी तपासाला गती देऊन सत्य लवकरात लवकर समोर आणावे,” अशी मागणी रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असून पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Previous articleजलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर’ उत्साहात
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here