माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जाहीर मेळावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन

0
61

माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जाहीर मेळावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन

बारामती (प्रतिनिधी) –
दि. माळेगाव सह. साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनींसाठी एक महत्त्वाचा जाहीर मेळावा गुरुवार, दि. २२ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कसबा-बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे.

या जाहीर मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी व दिशा ठरविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याचे आयोजन श्री. राजवर्धन शिंदे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) व शहराध्यक्ष जय पाटील यांनी केले असून सर्व सभासद बंधू-भगिनींनी तसेच पक्षाच्या आजी माझी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळ: गुरुवार, २२ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता
स्थळ: राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कसबा-बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here